सांज... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

24 अप्रैल 2016

सांज...

सांज झाली पांगल्या ह्या
पाखरांच्या सावल्याही,
चांदवाही मंद झाला
पण तुझी चाहूल नाही...
येई दुरुनी साद ती
की भास हा माझा असे,
गुंग तू मौनामध्ये का
आपली ही रीत नाही...
तेवते दारावरी या
एक पणती मंदशी
सांगते तुजला सख्या रे
या जगी अंधार नाही...
जे तुझे ते सर्व माझे
माहिती दुःखास आहे,
हे आता सांगू नको की
हे 'तुला' माहीत नाही...
- स्पृहा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें