खूप सुंदर पत्र आहे...दीपाचे...त्याचा शेवट खूप आवडला..."आई असण्या आधी तुझी असलेली."
----
माझ्या पिल्लांच्या बाबास - लेखिका - दीपा मिट्टीमनी
----
माझ्या पिल्लांच्या बाबास - लेखिका - दीपा मिट्टीमनी
माझ्या पिल्लांच्या बाबास,
खरं तर कुठून सुरुवात करावी तेच कळत नाहीये. हा असा अबोला निर्माण झाला की मला फार अस्वस्थ व्हायला होतं. गुंता सुटेपर्यंत मला चैन पडत नाही. तुझी मनापासून माफी मागून मगच पुढे बोलते. खरतर नवरा बायको ह्या नात्यात आपण फारसे कधी भांडत नाही पण आई वडील ह्या भूमिकेत शिरलो की अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहतात. आणि त्याला कारण म्हणजे आपल्या पिल्लांवर असलेलं आपलं जीवापाड प्रेम. दोन वेगळी मते असली की आपलच कसे बरोबर आहोत ह्या इरेला पेटून आपण आपल्यातलं सामंजस्यच विसरून जातो. मग शब्दाने शब्द वाढत जातो आणि दोन ध्रुव गाठले जातात. नंतर शांतपणे विचार केल्यावर कळतं की आपलं चुकलंच, जरा जास्त ताणून धरलंगेलं. पण ही सगळी नंतरची उपरती. काही जीवघेणे शब्द जातात आणि मग ते वार करून बसतात. ते परत घेता येत नाहीत कितीही इच्छा असली तरीही. काल रागाच्या भरात मी जास्त बोलले हे खरं तसं बोलायला नको होतं हेही खरं पण इतक्या टोकाची भूमिका घेण्यापर्यंत मी का पोचले असेन ह्याचा कधी विचार केला आहेस?
खरंतर विषय किती साधा होता. मनूची डेंटल व्हिजीट होती. तू म्हणाला होतास मी नेतो मग आयत्या वेळी तुझे कॉल मीटिंग, मला म्हणालास तू जा. तुला मिळेल सुट्टी. आणि मला त्याचाच राग आला. आई असले म्हणून प्रत्येक वेळी मी का धावपळ करायची सगळी? मग लाचारपणे बॉसला विचारलं, दोन ट्रेन बदलून घरी आले. आणि गेले. मी ठरवलं होत आज निवांत रमतगमत लेकसाइडने चालत कॉफीचे घुटके घेत यावं. तू लवकर येणार आहेस तर आज आपण जरा आराम करावा. तुला हे सांगितलं तर तू म्हणालास तुझी कॉफी माझ्या मिटिंग पेक्षा महत्वाची आहे का? तर त्याच उत्तर आहे 'हो'. त्या क्षणाला ती महत्वाची होती माझ्यासाठी आणि ह्याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तू किंवा मुली माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. भांडताना मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि शाब्दिक चढाओढ सुरु होते. तार्किक सुसंगती हरवून बसतो आणि त्या क्षणाला जिभेवर जे येईल ते बोलतो आपण. अशाच भरात मी वैतागून काहीबाही म्हणाले. बस तेवढच एक लावून धरलंस आणि त्या क्षणापासून जो अबोला धरला आहेस तो आतापर्यंत.
खूप थकले आहे रे मी सगळीकडे धावून धावून सगळं करताना. संसार हा एक अखंड चालणारा यज्ञ आहे. त्यात आहुती टाकतच राहावी लागते. मुली, त्यांचे अभ्यास, नोकरी,घराची कामं, तुझी परदेशवारी, तेवढ्या काळात सगळं एकटीने लढवणं, आजारपणं, खेळ, वाढदिवस …. ही यादी संपतच नाही. सतत सेवेस, हाकेस, धावपळीस तत्पर राहावं लागतं . सुपरवुमन चा रोल करून जाम दमले आहे. वाटतं बास आता नाही झेपत हे सारं. ह्या सगळ्यात माझी मी कुठेतरी हरवून गेले आहे. दोन शब्द स्वत:शी बोलायला फुरसतच नाही.
कधी कधी वाटतं पूर्वीच्या बायका चूल आणि मूल एवढ्यात अडकलेल्या होत्या तेच बरं होतं. रीतसर विभागणी होती . स्वप्नांची क्षितीजं नाहीत की ध्येयाची निशाणं नाहीत. वयाच्या पाचव्या वर्षापासून तुला संसारच करायचा आहे हे मनी बिंबलेलं असायचं. ह्या एकविसाव्या शतकात स्त्री म्हणे मुक्त झाली. मुक्त कसली मला वाटतं जास्तच अडकली. करीयरच्या नावाखाली एक दार तर उघडं झालं. पण उंबरयात बसवलेल्या बेड्यांकडे तिचं लक्षच नव्हतं. ती वासरं सोडतात ना पाण्यावर, लांब कासरा बांधून तसंच. सोडल्यावर वासराला वाटतं आपण आता मुक्त आहोत आणि ते धडाधडा धावू लागतं. आणि मग काही अंतरावर त्या कासरयाचा परीघ संपतो आणि त्याच्या मानेला एक जोरदार झटका बसून ते अडखळतं. मुलींचं तसच होतंय. स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली त्यांना मुलांसारख वाढवलं जातं. करियरच्या दिशा दाखवल्या जातात. आणि मग लग्न होताक्षणी तिने मागच्या शतकातल्या कर्तव्यदक्ष गृहिणीची भूमिका घेण अपेक्षिल जातं.

मग ह्याचा अर्थ मला हा संसार, मुली नको आहेत असा होतो का ? तर नाही हे सगळ मलाही प्रिय आहे. फक्त मला ह्या सगळ्यातून थोडी सुट्टी हवी आहे. निदान अधूनमधून. आता तू म्हणशील मी करत नाही का काही मदत? तर तसंही नाहीये तुझ्या परीने होईल ती सगळी मदत तू करतच असतोस फक्त प्रत्येक वेळी मला गृहीत धरून. म्हणजे तू जेव्हा घरी आहेस तेव्हा जे जमेल ते तू करणार. मी मात्र सगळं जमवून मगच बाहेर पडायचं . ह्या सगळ्याचा खूप ताण येतोय माझ्यावर. किती पटकन तू ठरवतोस मी आज उशीरा येईन, लवकर जाईन, रविवारी माझी पार्टी आहे, पुढच्या आठवड्यात मी नाहीये. मी असं परस्पर काही ठरवू शकते? मला मुभाच नाहीये ती. इतकं करकचून बांधून टाकल्यासारखं वाटतं कधीकधी. मधेच लटकलेल्या पतंगासारखी अवस्था झालीये आजच्या स्त्रीची. म्हणजे नोकरी करावी तरी कसरत आणि न करावी तरी घुसमट. अगदी त्रिशंकू अवस्था. एक मूल झाल्यावर सगळं सांभाळता येत नाही म्हणून कित्येक शिकलेल्या मुली आज घरी बसून आहेत. मुलांमध्ये जीव अडकतो खरा पण चोवीस तास तेच करत बसण्याच ट्रेनिंग पण नाहीये त्यामुळे एका प्रकारच्या नैराश्याच्या गर्तेत सापडल्यासारखं होतय. घरीच बसायचं तर कशाला एवढा आटापिटा करून शिकलो? असाही प्रश्न उभा राहतो. ह्या सगळ्यावर मात करून धडपडून नोकरी करायचीच तर तिची उडणारी तारांबळ बघवत नाही. का दोघं मिळून सांभाळू शकत नाहीत? कदाचित खरया अर्थाने समानता यायला अजूनही काही शतकं जातील पण तोपर्यंत निदान परस्पर सामंजस्याने वागून ही गाडी सांभाळूया? एक चाक थकलं तर दुसरही अडकतच. माहीत आहे ना?
असो.
असो.
आई असण्याआधी तुझी असलेली मी .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें