' असं ' होतंय काहीतरी !
खूप महत्त्वाचा एखादा कागद शोधण्यासाठी ड्राॅवर उघडतो... सगळं खूप वर-खाली उद्ध्वस्त करतो... बघत बसतो एखाद्या जुनाट कागदाकडे... मग डोक्यातून जातंच की नक्की काय शोधत होतो... तरीही शोधत राहतो सगळं ड्राॅवर पुन्हा पुन्हा ...
' असं ' होतंय काहीतरी !
' असं ' होतंय काहीतरी !
काॅलेजमधले सारेच जवळचे मित्र आता परदेशात ... कोणाचाही फोन आला की थरारुन जातो... ते दिवस, ते संकेत, ती धमाल सगळं बोलायचं असतं, पण उगाच म्हणतो की " आता थोडा गडबडीत आहे... पण नक्की बोलू हं नंतर " फोन ठेवतो आणि घरच्यांना तासन् तास सांगत राहतो त्याच मित्रांचे किस्से... आई म्हणते " मग मघाशी फोन का बंद केलास ? " मी न ऐकल्यासारखं करतो आणि पुन्हा सांगतो तेच किस्से जे किमान दोनशे वेळा ऐकले आहेत सगळ्यांनी . . .
' असं ' होतंय काहीतरी !
' असं ' होतंय काहीतरी !
' तारे जमीं पर ' बघताना ' तुझे सब है पता मेरी माॅं ' ही ओळ ऐकली आणि वेडावून गेलो... गाणं संपल्यावर थेट घरी आलो. आई नेहमीप्रमाणे प्रसन्न चेह-यानं म्हणाली, "या ! झाला पिक्चर ? " मी म्हणालो, " नाहीच गेलो ... " आई म्हणाली, " बरं ! पण खिशातून तिकिटं काढून ठेव. त्याचा रंग लागेल शर्टला... " मी पुन्हा एकदा तेच गाणं ऐकतोय असं वाटलं... थिएटरमधलं राहिलेलं रडणं बाथरुममध्ये पूर्ण केलं . . .
' असं ' होतंय काहीतरी !
एखाद्या संध्याकाळी मारव्याचा कोमल ऋषभ असा दुखतो काळजात की वाटतं आता नाहीच सापडणार आपल्याला आपल्याच घरचा रस्ता , नाहीच सापडणार 'रे' आणि 'नी' मधला तो षडज... कुठेतरी वाचलं It will be lonelier without loneliness ते आवडलं... एकटेपणा आहे म्हणून खूप एकटं वाटत नाही... बाप रे ! अशी संध्याकाळ अंगावर धावून येते... तरी हवीहवीशी वाटते ती वेळ... ते अधांतरीपण ...
' असं ' होतंय काहीतरी !
' असं ' होतंय काहीतरी !
एखाद्या संध्याकाळी मारव्याचा कोमल ऋषभ असा दुखतो काळजात की वाटतं आता नाहीच सापडणार आपल्याला आपल्याच घरचा रस्ता , नाहीच सापडणार 'रे' आणि 'नी' मधला तो षडज... कुठेतरी वाचलं It will be lonelier without loneliness ते आवडलं... एकटेपणा आहे म्हणून खूप एकटं वाटत नाही... बाप रे ! अशी संध्याकाळ अंगावर धावून येते... तरी हवीहवीशी वाटते ती वेळ... ते अधांतरीपण ...
' असं ' होतंय काहीतरी !
एखाद्या रात्री मुलं गजबजतात भोवती भोवती आणि म्हणतात " गोष्ट सांगून झोपव ना ! " ... मी म्हणतो एवढं काम संपवून येतो... काम संपवून जातो तर मुलं देवासारखा चेहरा करुन गाढ झोपेत... मग माझ्यासाठी म्हणून थोपटतो त्यांना थोडा वेळ आणि मीही झोपाळतो... बाळाच्या जावळाचा स्पर्श... वाटतं कुठे बरं हा असाच स्पर्श जाणवला... आठवलं ! पंढरपूरला विठाईच्या पायाचा स्पर्श... अगदी तोच . . .
' असं ' होतंय काहीतरी !
' असं ' होतंय काहीतरी !
असं होतंय... असं होतंय आणि असंही... म्हणजे सांगू का नक्की कसं होतंय ते ? भरुन येतंय आभाळ, पण ढग पुन्हा विरून जातात... न कोसळताच... तसंच खूप खूप भरभरून सांगायचंय की काय होतंय पण जाऊ दे !
नकोच !
' असं ' होतंय काहीतरी !
नकोच !
' असं ' होतंय काहीतरी !
— डाॅ. सलील कुलकर्णी
संग्रह - लपवलेल्या काचा (२०११)
संग्रह - लपवलेल्या काचा (२०११)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें