जुन्या काळी पाऊस खुप पडायला की खेडेगावात एक प्रथा असायची, अजूनही कुठेकुठे चालूच आहे ती प्रथा.
भाकर भाजायचा तवा अगदी गरम करायचा आणि लहान मुलांना तो गरम तवा घेऊन भर पावसात धाडायच, पावसाला चटके द्यायला. अशान पाऊस पळून जाईल ही धारणा होती.
या पावसाळ्यातही असंच काहीस झाल वाटत.
भाकर भाजायचा तवा अगदी गरम करायचा आणि लहान मुलांना तो गरम तवा घेऊन भर पावसात धाडायच, पावसाला चटके द्यायला. अशान पाऊस पळून जाईल ही धारणा होती.
या पावसाळ्यातही असंच काहीस झाल वाटत.
पाऊस आला नी पुन्हा तुझी आठवण तीव्र झाली. तस तर तू रोजच आठवतेस यार पण पाऊस आल्यावर तर...शप्पथ, काय सांगू तुला...त्याच आठवणी घेऊन मी तडकच जायचो यार पावसात.
पण नंतर पाऊस चक्क थांबलाचय यार!
त्यालाही हे चटके सहण नाही झाले. चुकलोच दरवेळी सारखं मी.
चुक झाली पावसा...
चुक झाली पावसा,
नाही होणार पुन्हा अशी चूक,
सहेन माझ मीच,
नको छळूस आता होईल मी मुक...
नाही होणार पुन्हा अशी चूक,
सहेन माझ मीच,
नको छळूस आता होईल मी मुक...
मला काय माहित?
तुही भला भाऊक असशील,
माझ्या आठवणींच्या चटके,
तू का बरं सहण करशील...
तुही भला भाऊक असशील,
माझ्या आठवणींच्या चटके,
तू का बरं सहण करशील...
माझ्या आठवणी मी
धुवायला माञ आलो नव्हतो,
पेटलेल काळीज माझं
थोडं थंडच करायला आलो होतो...
धुवायला माञ आलो नव्हतो,
पेटलेल काळीज माझं
थोडं थंडच करायला आलो होतो...
नाही कळलं मला
नाही जमल तुला,
दया कर दुसर्यांवर तरी
त्यांचा नाही ह्यात गुन्हा...
नाही जमल तुला,
दया कर दुसर्यांवर तरी
त्यांचा नाही ह्यात गुन्हा...
दिलेला शब्द मी
तंतोतंत पाळेल,
वाढलीच जरी तीव्रता तुझ्या येण्यान
तुझ्या पासून दूर पळेल...
तंतोतंत पाळेल,
वाढलीच जरी तीव्रता तुझ्या येण्यान
तुझ्या पासून दूर पळेल...
अगदीच शक्य नसेल तर माञ
एखाद्या वेळेस माफ कर
मुद्दाम नाही देणार ञास
प्लीज माझ्यासाठी एवढंच कर...
एखाद्या वेळेस माफ कर
मुद्दाम नाही देणार ञास
प्लीज माझ्यासाठी एवढंच कर...
प्लीज माझ्यासाठी एवढंच कर...
---धनंजय
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें