तूच... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

10 मई 2015

तूच...

तूझ्या बद्दलच अफेक्शन आता एवढं वाढलय की माझे भाबडे शब्द आता अपुरे पडायलेत...कवितेतून तर तू कधीच बाहेर आलीस माझ्या कारण तिला पण तिचा आवाका माहितीय, तू तिच्यात मावणार नाहीस...आणि माझे भाबडे शब्द आता अपुरे पडलेत तुला कवितेत कैद करायला तुला...म्हणूनच की काय कविता लिहीता लिहीता तिचा धडा होत चाललाय...धडा की कविता? या प्रश्नामध्ये मला पडायचच नाही...फक्त तूला लिहुन काढायचय बस्स...

तुझ्या निव्वळ असण्यानच कित्तीतरी बदल जाणवलेत मला माझ्यामध्ये, तुझ्या नकळत...
पण मी एक ठरवूनच टाकलय आज की मी नाही सांगणार तुला की तू मला कित्ती आवडतेस ते...

कारण जर तू जर हो म्हणालीस तर तर??? माहितीय मला माझं डेस्टिनेशन भेटेल आणि...आणि माझ ध्येयच संपुन जाइल ग आणि तुझ्या कडूनच मिळालेल्या माझ्या डेस्टिनेशनलेस फिरण्याच कारणच मग काय होइल???

कारण तू जर नाही म्हणालीस तर??? तर मग प्रेमभंगाच्या universal नियमांप्रमाणे मग मी पण मग सायलेंट होऊन बसेल...आणि हरवून जाइल पुन्हा सगळ...reset होईल सगळ मग...अगदी तू भेटायच्या आधीच्या स्टेज पर्यंत अगदी!!!

म्हणूनच मग...तू ही वाचत असशिल कदाचित हे सगळं, अगदी सगळं, तू ही हळहळशील माझ्या साठी की ह्याने सांगून टाकाव सगळ जी कोण आहे तिला...अग वेडे पण ती तूच नसशिल कशावरुन???
------धनंजय

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें