चौकट मोडून बघेन म्हणतो,
मनासारखा जगेन म्हणतो,
परी नेमका येउन छळतो प्रश्न एक कातील,
पण लोक काय म्हणतील???
झेलीत पाऊस चिंब भिजावे,
सुचेल गाणे तिथेच गावे,
वाटे शिंगे मोडून व्हावे वासरांत सामील,
पण लोक काय म्हणतील???
भीड भाड हुसकवील म्हणतो,
जगास हिम्मत दावील म्हणतो,
फाडीन म्हणतो सर्व मुखवटे जिथे जसे दिसतील,
पण लोक काय म्हणतील???
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें