The unforgettable ones... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

30 नवंबर 2016

The unforgettable ones...


प्रवास_१...
रोजच्या ठराविक प्रवासाची किती सवय पडावी ना! अनेकदा नाईलाजाने सुरु केलेला हा अप—डाऊनचा प्रवास मग ईतका अंगवळणी पडतो, याची जाणिव एकतर  सुट्टीच्या दिवशी किंवा रुटीन बदलल्यावर (बस, रेल्वे...ई....सुटल्यावर) होते. या प्रवासातल्या व्यक्तीही मग सवयीच्या होऊन जातात. माझाही पहिला प्रवास नाईलाजानेच सुरु झाला होता. कोण कुठपर्यंत प्रवास करणार, तिकीट मागण्याच्या वेगवेगळ्या टोनींग (ती पैशो वाली), तो रुमाल अंथरुन बसणारा कार्यकर्ता, ती ऊंचच ऊंच पोरगी (ऊंट), तो बसपास दाखवल्यावर तोंड आंबट करुन बघणारा परीवर्तन बसचा कंडक्टर, तो नाजूका बसचा हात सोडून ततंबाखू मळत गाडी चालवणारा ड्रायवर, त्या एकाच सजवलेल्या बसमध्ये असलेल्या टेपरेकाॅर्डरवची 90's मधली भान विसरायला लावणारी गाणी, सिटीबस मधले ओळखीचे पण अनोळखी चेहरे, "त्याच" सीटवर जागा पकडण्याची धडपड अन् नियमाप्रमाणे ऊशीरा निघून धावतपळत जाऊन बस पकडणं (मी बस आणि सिटीबस मध्ये केलेल्या चार वर्षांच्या प्रवासात बोटावर मोजण्याईतक्या वेळा निवांत बस पकडली असेल) मीच सिटीबस मध्ये रुजवलेलं हेडफोन च culture, माझ्या प्रवाश्यांबद्दल असलेल्या वैयक्तिक अन् अतिवैयक्तिक भावना, माझा लाडीलप्पा...अन बरंच काही...
MindsRiot
Dhananjay
To be continued...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें