ऐ ऐक ना... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

30 अगस्त 2016

ऐ ऐक ना...

ऐ ऐक ना...
मला ना तुला ऊगीचच भेटावसं वाटतं
तुला भेटल्यावर विनाकारण छेडावसं वाटतं,
तुझ्याच एखाद्या शब्दाचा गैर अर्थ करुन
तुझ्याशी खोटं खोटं भांडावसं वाटतं,
निरर्थक आपले विषय चर्चा करुन झाल्यावर
आजूबाजूचे प्रश्नार्थक चेहरे पाहून वेड्यागत भासतं...

ऐ ऐक ना...
तुझं तर कधी चुकतच नाही ना
माझं कधी चुकल्यावर माञ तू संभाळून घ्यावस वाटतं,
तसं तर चूक सगळ्यांचीच होत असते
न सांगून तुला अज्ञानात ठेवावसं वाटतं,
सगळं देऊन काढून घ्यायची किमया तुला जमली
मला मात्र त्याच दिवसांत सदैव रहावसं वाटतं...

ऐ ऐक ना...
गेलीस जरी दूर पण अनाहूत भेट झाल्यावर
पुन्हा पहिल्यासारखंच भेटावस एवढीच अपेक्षा भाबडी,
तेवढीच माझी आटलेली कविता
भरुन वाहील वाटतं...

ऐ ऐक ना...
माझं तर हे नेहमीचच,
कधीकधी "तू" ही असंच करावंस वाटतं... 


धनंजय...
#Mindsriot

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें