ऊंबर्‍यावरची कविता... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

24 दिसंबर 2015

ऊंबर्‍यावरची कविता...

पहाट स्वप्नीच्या तुला ऊजळण्या,
धुंद हवेची आस घेतली,
गॅलरीमध्ये येताना ऊंबर्‍यावर टचकन,
ठेच तेवढी लागली...

अशी अचानक तुझ्यावरती,
ऊंबर्‍यावरची कविता त्या वेदनेतच भेटली!


माहित असूनही निरागसतेने तिने विचारल,
ईतके दिवस कुठे होतास?
होते तुझ्याच मनामध्ये मग,
का नाही लिहायचा प्रयास?
मला विसरतोस की काय,
वाटत होती भिती,
म्हणूनच मग अचानक भेटले,
न जानो मग होईल येतीजाती...


माहित आहे तरी सांगूच,
माझा एक भाबडा प्रयास...


तू तर ऊंबर्‍यावरच होतीस...
चार इंच ऊंबर्‍याच केवढं ते महात्म्य!!!
फरक केवढा अलिकडे पलिकडेचा...
ऊंबर्‍याच्या या बाजूला म्हणजे आत,
ऊंबर्‍याच्या त्या बाजूला म्हणजे बाहेर...


ऊंबर्‍याच्या या बाजूला तू शब्दबध्द,
ऊंबर्‍याच्या त्या बाजूला तू मनामध्ये...

या बाजूला तू माझी,
त्या बाजूला तू फक्त मनात...
ती positive असली की तू कागदावर
ती negative झालीस की तू मनामध्ये,
तिच्या कसल्याही response ने तू बहारात येतेसच,
ती null असल्यावर माञ तू बाहेर...


तू माझी असण्याच कारणच ती असते,
तुझं ऊंबर्‍यावर असण सहाजिकच आहे,
तू आत की बाहेर? फक्त तिचीच मर्जी असते...
(यात तू म्हणजे कविता आणि ती म्हणजे...)
                                                                                                                ...धनंजय लांब

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें