हट्ट... - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

23 जुलाई 2015

हट्ट...

हट्ट...
माहित असून ही बहूतेकदा होणार्‍या प्रकारातला एक म्हणजे हट्ट. अजूनही हट्ट म्हटल की तीन प्रकार हमखास आठवतात, राज हट्ट, स्ञी हट्ट आणि बालहट्ट. या हट्टांचे किस्से,इतिहास पुराण सर्वश्रुत आहेत. आता हा हट्ट सामान्यांपर्यंत केंव्हाच पोहोचलाय. हट्ट का, कशासाठी आणि/किंवा कुणासाठी करायचा हा न सुटलेला प्रश्न जणू.
पण हट्ट पुर्ण झाल्यावर, खरं सांग, पुढं काय असतं?
मला काय वाटतं सांगू, सत्य समझलं की, मोह, हट्ट कमी होतो. ज्या गोष्टींसाठी लहानपणी हट्ट करायचो, ज्यासाठी साठी मग जेवणही नाही करायचो, वेळी मारही खायचो, त्या कोणत्या गोष्टी होत्या हे आता नाही आठवत पण हे आठवतय की काही दिवसांनी त्या अडगळीत जायच्या, विस्मृतीत जातातच यार. साध्या फोन वरुन स्मार्ट फोन वर स्विच होताना तुमच झालेल आठवतय? घेतानाची intensity आणि घेतल्यावरची...काही फरक वाटतोय?
हट्ट म्हणजे अपेक्षा आणि अपेक्षा बद्दल मी आधीच सांगितलय.
हट्ट पुर्ण झाला की...पण तो कमी अधिक का होईना पुर्ण व्हायलाच हवा तेंव्हाच...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें