एका भर दुपारी गावाकड गेलो होतो, रानातल्या घराकड जाताना रस्त्यात पाटील दिसले (पाटील हे सर्वनाम या अर्थाने), दुपारचं जेवण उरकून दारातल्या अवाढव्य अंब्याच्या झाडाखाली पान खाऊन तंद्री लावायच्या तयारीत होती स्वारी, मला हाक मारुन बोलवून घेतलच. इकडल्या तिकडल्या गप्पा मारुन झाल्यावर मी सटकणं पसंत केल. पाटीलांचा स्वभाव तसा चांगला पण "हम करेसो कायदा" आणि "मोडेनापण वाकणार नाही" ही वृत्ती अनेकांना खटकायची, निव्वळ या खोडीपायी त्यांनी लाखाचे बारा हजार केले पण ताठा कायमच. मनात म्हणालो यांना कुणी जर दुसरी बाजू पटवून सांगू शकल असतो तर?
मनात नेहमी प्रमाणे विचारांची दंगल सुरु झाली. परस्पर विरोधी म्हणी डोक्यात गोंधळ घालायला लागल्या.
पाटलांना "मोडेल पण वाकणार नाही" बरोबरच जर कुणी "महापूरे झाडे जाती तेथे लव्हाळे रहाती" हे पण जर कुणी पटवून सांगितल असत तर आज पाटलांच पाटील हे सर्वनामा पुरत नक्कीच राहील नसत.काही विद्वान "शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा" याचा शब्दश: अर्थ घेऊन स्वत:च वाटोळ करतानाही मी पाहीलेत, त्यांनाही जर कुणी "हत्ती बनून लाकड फोडण्यापेक्षा मुंगी बनून साखर खावी" हे सांगू शकले असते तर? (हे सांगण्याच काम अगदी जवळच्यांनीच कराव लागत, माझ्या सारखे ञयस्थ फक्त सुचवू शकतात)
म्हणींपुरतच नाही पण माझ्यामते प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्या चांगल्या किंवा वाईट, दोन्ही नसतात, जी पटते किंवा पटवून सांगितली जाते तीच खरी असते. दोन्ही बाजू समजून घेऊन परिस्थिती नुसार बदलणारेच काहितरी वेगळ करु शकतात.
एखाद्या तिसर्या व्यक्तीबद्दल हि भरपूर जन फक्त ऐकूनच मत बनवून घेतात, ते मग depend करत सांगणाऱ्या वरच. पण कान आणि डोळे यातील जे दोनच बोटांच अंतर आहे त्यात काही अनुभवानंतर जमीन अस्मानचा फरक असतो हे मी स्वतः अनुभवलं आहे.
एखाद्या व्यक्तीबद्दल हेतुपुरस्पर किती आणि कश्या प्रकारे चांगल/वाईट मत बनवता येऊ शकत आणि ह्याच फटका मी जवळून अनुभवलाय…it really hurts... जेव्हा तुम्ही दुसरी बाजू बघत नाही तेंव्हा…
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें