हे हे लिहीनं आवश्यक आहे मी तुला माफ करायचा विचार माझ्या मनात यायच्या आधी, मग पुन्हा मग माझ्या रागाची तीव्रता कमी होईल पुन्हा हे शब्द विरून जातील नेहमी सारखे. कारण हे तू सुरू केलंस, जसं मला नेहमी वाटतं. मन शोधक तुझ्या मनानं माझ्या दंगलीवाल्या मनाला wicked mind म्हणलं आणि आधीच सटकलेल्या टाळक्याला अजून त्रास झाला पण जसं मी जास्त सटकलो की जास्तच शांत होऊन जातो तसं झालं. त्या शांततेच्या तडाख्यात कोणी येऊ नये असं वाटत राहतं. आणि हो आहे ना माझ्या डोक्यात प्राॅब्लेम, असू देत. तसही च्युत्यात निघायची सवय होऊन गेलीय आता. आणि तुझ्या डोक्याचं पण काय आहे ते पण तूच ठरव आणि तुझ्या जवळच राहू दे, कळू दे तुझ तुलाच. माझ्या साठी पण तुझं डोकं तितकंच प्राॅब्लेमॅटीक आहे.जा...
Maybe you were right
I don't wanna fight
I'm tired of being sorry
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें