उलगडा-मन गुंतून पडणे म्हणजे काय??? - MindsRiot !!!

Breaking

काश तुझ पर भी, लागु होती "RTI"...ऐ जिन्दगी तुझसे, बहुत से जवाब चाहिए..

11 सितंबर 2017

उलगडा-मन गुंतून पडणे म्हणजे काय???


तीन दिवसांच प्रशिक्षण, डहाणूला, त्याच्यासाठी ठरलेलं नसताना एक दिवस आधी निघणं. त्या दिवशीचे क्लास ऍडजस्ट करायचे राहिलेले म्हणून सासूबाईचे फोन वर फोन...डोक्यात अडजस्टमेंटचा मचळा, हेडफोन मध्ये वाजायलेलं Enrique Iglesias चं tonight  I'm....you भनकायलेलं.
तसंही प्रवास म्हटलं की मन गाडीपेक्षा कैकपटिंनी जोरात सैरभैर होत बुद्धी अन् चित्ताची पार विकेट घेऊन टाकतं.
वैजापूर. डोक्यात तसाच मचळा. ईतके दिवस कधीमधी मनात चमकून जाणारी, सहसा स्वप्नात अन् अनेकवेळा दिवास्वप्नात मुक्काम ठोकणारी ती एकदम नजरेसमोर आली, हेडफोन मधलं नुकतच वाजायला सुरु झालेलं अंकितचं मत जा रे मत जा...
तशीच रुबाबदार, देखणी...आ..हा...हा. पळत जाउन तिच्याविषयी चौकशी करावी वाटत होतं, पुन्हापुन्हा...पण, हायsss.नाहीच जमलं. बाकीचे सगळे विचार येथेच्छ लाथाडून लावत मन मात्र तिथंच रेंगाळत राहिलं, कितीतरी वेळ.
हेडफोनवर साधना सरगमचं मेरे ख्वाबो मे तू...
त्याच्यानंतरच्या ओय राजू प्यार ना करीयो...ने मात्र मन ताळ्यावर आलं. पुढं पुर्ण प्रवासात कित्येकदा तरी तिची ऐटबाज छबी मनात येतेय.
अरेsss हॅलो कोण समजताय???
अरे तिच ती, येझदी...माझी ड्रीम बाईक
दातं काढण्यापेक्षा एक मिळवून द्या कुठून तरी...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें